आजचा दिवस आईबरोबर घालवला. अगदी बिलगून बिलगून घालवला. मी तर मी पण ती ही माझ्यासोबत लहान झाली होती. बोलता बोलता दोघी मनाने नाशिकला जाऊन आलो, जुन्या दिवसांत डोकावून आलो. ते दिवस म्हणजे आमच्या दोघींच्या मनाच्या खूप जवळचे आहेत. मनाच्या ज्या कोप-यात हे सोनेरी दिवस जपून ठेवलेत तो कोपराही अताशा फार संवदेनशील झालाय. आणि मग आई जुनंच एक वाक्य परत बोलून गेली.
" माझी नोकरी झाली त्यामधे तुझीही खूप मदत झाली आहे बरं का "
या आधीही नाशकात असताना ती अनेकदा असं म्हणाली होती पण तेव्हा याचा नेमका अर्थ कळलाच नाही ! उलट तेव्हा असं वाटायचं की आईलाच माझं म्हणणं कळत नाहीये. कध्धीऽतरी मी तिला म्हणायचे-
"ए आई, आजच्या दिवस नको ना जाऊ ऑफिसला, प्लीऽऽज"
पण नंतर हे ही म्हणायचे-
"नको, जाऊ दे, जा. मी ही शाळेत जाईन मग तू बोअर होशील घरी"
आता हे सगळे संवाद अगदी व्यवस्थित समजतात.
आणि मग ही गज़ल आठवली..

मान्य करते नाईलाजाहे जरी
एकदा लवकर परत आई घरी
एकदा लवकर परत आई घरी
रोज आले की घरा दिसते कुलूप
तू तशी दिस एकदा दारावरी
तू तशी दिस एकदा दारावरी
सारखा टीव्ही बघुन कंटाळते
थांब ना तू बोलण्यासाठी तरी
थांब ना तू बोलण्यासाठी तरी
भाग आहे एकटीने जेवणे
पोट भरते तू जवळ असल्यावरी
पोट भरते तू जवळ असल्यावरी
चार भिंतींना जमत नाहीच बघ
प्रेम तू करते जसे माझ्यावरी
प्रेम तू करते जसे माझ्यावरी
पण असो ! हे ही दिवस जातील गं
मी समंजस आणखी झाल्यावरी
मी समंजस आणखी झाल्यावरी
- अदिती कापडी
१४ फेब्रुवारी २०१५
Comments
Post a Comment