कविता- एक लेखणी

विचार जेव्हा 
भयाण रात्री
मनामधे
थैमान घालती
ऐकून झाली
असंख्य गाणी
अशा प्रसंगी
सांत्वन करते,
सोबत करते
एक लेखणी
...
कवेत घेतो
कागद जेव्हा
शब्द नव्याने
सुचू लागती
अर्थालाही
अनेक अर्थ
कसे नव्याने
मिळू लागती
उमटून येती
स्वतः कल्पना
मुळीच नाही
लागत आता
गणमात्रांचे
गणित जुळाया
कागद घेतो
जुळवून सारे
कागद करतो
वेडी किमया


अदिती कापडी
२ मे २०१५

Comments