तुझे किनारे तुझ्याच लाटा
तुझे नकाशे, तुझ्याच वाटा
तुझा दुरावा तुझीच सलगी
तुझी फुले अन तुझाच काटा
तुझे नकाशे, तुझ्याच वाटा
तुझा दुरावा तुझीच सलगी
तुझी फुले अन तुझाच काटा
तुझा झरा अन तुझीच खळखळ
तुझे नभांगण तुझेच तारे
तुझी पालवी तुझी पानगळ
तुझी झुळूक अन तुझेच वारे
तुझे नभांगण तुझेच तारे
तुझी पालवी तुझी पानगळ
तुझी झुळूक अन तुझेच वारे
तुझा प्रश्न अन तुझेच उत्तर
तुझेच फासे तुझीच खेळी
तुझी साठवण तुझी आठवण
मनी उसळते सदा अवेळी
तुझेच फासे तुझीच खेळी
तुझी साठवण तुझी आठवण
मनी उसळते सदा अवेळी
तुझी भांडणे, तुझाच निर्णय
तुझे वचन अन तुझे पलटणे
तुझा राग अन तुझ्याच शंका
तुझ्याच शपथा, तुझे बदलणे
तुझे वचन अन तुझे पलटणे
तुझा राग अन तुझ्याच शंका
तुझ्याच शपथा, तुझे बदलणे
तुझी नजर अन तुझे इशारे
तुझे बिलगणे तुझे शहारे
तुझीच व्याप्ती, तुझे रितेपण
तुझेच सारे, तुझेच सारे..
तुझे बिलगणे तुझे शहारे
तुझीच व्याप्ती, तुझे रितेपण
तुझेच सारे, तुझेच सारे..
अदिती
११ जानेवारी २०१६
Comments
Post a Comment