"हे उगाच माझेच प्रश्न
मलाच (कधीतरी का होईना ) सुटावे, ह्यासाठीचं स्वगत.
पुढे आणखी विचार हल्ला बोल करत आले तर एवढाही विचार करता यायचा नाही. माझ्या
डोक्यातल्या (कदाचित निरर्थक, वेळखाऊ, आणि नाटकी ) गुंत्यात
तुम्ही न अडकलेलंच बरं. त्यापेक्षा इतर पोष्टी वाचा.
आणि “वाचायला द्यायचंच
नव्हतं तर का ब्लॉगवर टाकलं” असा विचार डोक्यात
आला असेल तर-
मी काही स्वतःशी फार प्रामाणिक नाही. जगाशी तर त्याहून नाही. दोन शरीरं तावातावात केवळ ऑरगॅजमसाठी जवळ येतात, तेव्हा ती दोन्ही शरीरं त्या ३-४ मिनिटांत जितकी स्वार्थी असतात, तितकीच मी सुद्धा आहे. ३-४ मिनिटांसाठी नाही, तर सतत. २४ तास. त्यामुळे हे फक्त माझ्याकडेच राहिलं तर ते मी कधीही एडीट किंवा डिलीट करू शकते. ब्लॉगवर टाकल्यावरही एडीट, डिलीट करता येतंच, पण तोवर कोणीतरी तरी वाचलं असण्याची शक्यता असते. मग मी इथून किंवा माझ्या लॅपटॉपवरून किंवा माझ्या डायरीतून डिलीट केलं, तरी ‘कोणीतरी वाचलेलं असेलच. त्यांच्या डोक्यातून कसं डिलीट करणार’ ही भावना मनाला परिक्षेतल्या सुपरवायजरसारखी कुत्सित हसत चिडवत रहाते. आपल्या ताब्यातलं सगळं करून होऊनसुद्धा हवी ती गोष्ट साध्य होत नसेल की अहंकार धूम ठोकतो. म्हणून ब्लॉगवर प्रकाशित करून ठेवलंय. आता हे कोणी, केव्हा, कुठे वाचलं आणि काय विचार केला हे मला माहिती नसल्याने there will always exist a copy of this post somewhere in this World, which I won’t be able to access and manipulate. So..)"

आपण कितीही चांगलं वागलो तरी लोकांना वाईट वागायला शेवटी आपणच सापडतो. वाईट म्हणजे नक्की अशी काही व्याख्या नाही. पण प्रत्येक गोष्ट सापेक्ष असते ह्यावर माझा हळुहळू विश्वास बसत चाललाय. त्यात चांगुलपणा येतो, तसाच वाईटपणाही येतो. कोणाशी चांगलं किंवा वाईट वागण्याचं काही विशेष गणित नसावं बहुतेक. आपला दिवस कसा गेला ह्यावर समोरच्याशी आपल्याकडून कसं वागलं जाईल हे ठरून जातं. आपल्या नकळत. अनेकदा. ते विशिष्ट वागलं जाणं माझ्या दृष्टीने वाईट असेल, पण समोरच्याच्या दृष्टीने नसूही शकतं. किंवा मला वाटतंय त्यापेक्षा अनेक पटींनी कमी वाईट असू शकतं. हे सगळं तसं नीट, आवरून मांडणं कठीणेय. विचार ‘अकेला नही झुंड मै आता हूँ’ च्या चालीवर आपल्यावर घोळक्यात जोरदार पळत पळत हल्लाच करतात जवळपास. त्यातल्या प्रत्येकाला एकेकटं बाजूला घेऊन समजून घेणं, त्यावर डोक्यात प्रक्रिया घडवून आणणं, आणि मग त्याचा एक काहीतरी ठाम निष्कर्ष काढून ‘हां, हा विचार ,संपला. आता पुढचा घेऊ’ असं काही करता येत नाही. तर ते असो.
मुद्दा असा, की मला वाटतं मी वागतेय ते खोटंय. माझी मी सोडून इतर कोणत्याही किंवा प्रत्येक व्यक्तीशी होणारी इन्टरअॅक्शन खोटी आहे. कृत्रीम आहे. जेन्युईनली खोट वागलं जातं माझ्याकडून.
वर म्हटलंय तसं, एखाद्या साध्या
संभाषणात एखादा माणूस माझ्याशी विनाकारण खवळून बोलला, तर माझा मूड जातो. का, तर मी शांत होते, मी जो काही प्रश्न
त्या माणसाला केला तो ही फार चिडवणारा नव्हता. बरं, मी तोच तो प्रश्न
अनेकदा विचारून झालाय असंही नाही, पहिल्यांदाच विचारला.
किंवा त्याचं आणि माझं इतक्यातच काहीतरी वाजलंय असंही नाही, आमच्यात सगळं
चांगलंय. पण तरी तो माझ्याशी खवळून बोलला, वैतागून बोलला. असं
का? एखाद्याचे पेशन्स संपल्यानंतर त्याचा राग, संताप अनावर होऊन
त्याचा कुठेतरी उद्रेक होणं सहाजिकच आहे. पण प्रत्येकाच्याच बाबतीत ती पेशन्स
लेव्हल संपल्यावर भेटणारी पहिली व्यक्ती मीच का असावी हे
गणित काही उलगडत नाही.
मला माझा राग कळतो. मला बेसिकली माझे भाव कळतात. मला काय होतंय हे माझं मला ठाऊक असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचंय.
मला माझा राग कळतो. मला बेसिकली माझे भाव कळतात. मला काय होतंय हे माझं मला ठाऊक असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचंय.
माझी चिडचिड होतेय
का- सकारण की विनाकारण- सकारण असेल तर कारण काय, विनाकारण असेल तर
त्याचं कारण काय
मला राग आलाय का-
कशाचा/कोणाचा- का
मला अस्वस्थ वाटतंय
का- कशामुळे-त्याचं कारण काय-त्यावर उपाय काय
मला उदास वाटतंय का-
कशामुळे/का- कारण काय
मला वाईट वाटतंय का-
कशाचं, कोणाचं/कोणासाठी-का
मला आनंदी वाटतंय का-
कशामुळे-का
मला उत्साही वाटतंय
का- कशामुळे-का-हे टिकवून ठेवायला काय करता येईल
(सध्या तरी इतकंच आठवतंय)
हे शोधून काढलं की
त्याची कारणंही आपोआप शोधली जातात. मग जर मला माहिती असतं की मला अमुक
गोष्टीमुळे/व्यक्तीमुळे राग आलाय, तर मला हे ही माहिती
असतं की तो राग त्या गोष्टीच्या/व्यक्तीच्या संबंधित ठिकाणीच व्यक्त करणं गरजेचंय.
मला अ व्यक्तीचा राग आलेला असताना पण तो आसपास नसताना, ब व्यक्ती माझ्याशी
बोलत असेल तर माझ्याकडून आपोआप शांततेत बोललं जातं. जर कळत असूनही शांत रहाणं जमत
नसेल तर मी कसलीही भीड-भाड न बाळगता स्पष्ट सांगते- की मला वेगळ्या एका गोष्टीचा
राग आलेला आहे आणि माझी त्यावरून चिडचिड होतेय, आपण प्लीज नंतर
बोलूया का?
जाणिवा इतक्या सतत
जाग्या, जिवंत ठेऊन वागलं जात असेल तर काहीतरी गडबड आहे असं वाटतं. माझ्या
आसपास वावरणाऱ्या ९७ लोकांसारखं जर मला एकाचा राग दुसऱ्यावर काढता येत नसेल, किंवा माझ्याकडून
काढला जात नसेल तर म्हणजे मी फारच भान ठेऊन वागतेय, ठरवून वागतेय. = खोटं
वागतेय.
कारण खरं तर नैसर्गिक
आणि आपोआप वागलं जातं!
अदिती
अदिती
१३ ऑगस्ट २०१८
संध्याकाळी ५:३४ वाजता

Comments
Post a Comment