माहिती झाल्यावर आपण गृहित धरतो.
काही जणांशी गणित नेहमी चुकत गेलं. तुझ्याशी चुकतंय.
त्याच्याशीही चुकलं. मला सगळ्यांच्या बाजू पटायला नको. हा शाप आहे. आपलीच आतल्या
आत घुसमट होत रहाते. कोणाहीकडून अपेक्षा करू नये हे तत्त्वज्ञन म्हणूनच सोपंय
सांगायला, बोलायला, किंवा लिहायला, ऐकायला. करायला फार कठीण. आपलं माणूस म्हटलं की
अपेक्षा आल्याच. रोजच्या मरमर होऊन फरफटत नेणाऱ्या धबाडग्यातून फक्त काही म्हणून
आपले क्षण शोधायच्या नादात मी रिकामटेकडी ठरतेय. तुला भेटायच्या नादात मला कळलं की
मी माझी कामं किती पटापट संपवू शकते, कोणत्या कामांना किती महत्त्व देऊ शकते आणि
द्यायला हवं, आणि तुला किती प्राधान्य देतेय. झोप जशी कधीच पूर्ण होत नाही आणि
अजून पाच मिनीटं हवीच असते तसं लवकर निघून अजून पाच मिनीटं-अजून पाच मिनीटं जमवत
जमवत कामं कमीत कमी वेळात अडजस्ट करून जास्तीचा मिळवलेला किंवा कमवलेला अर्धा तास
बाहेर रस्त्यावर उगाच भरकटत वाया गेला की आपण फार पोरके आणि अनाथ आहोत असं वाटतं.
There should always
be at least a house, or a road, or a tree, or a person where you feel home. I’d
like to experience that once. Also, you’re never a priority unless you’re
blood-related or live in the same house. I’ve been feeling this since I don’t
even know when, but I’m writing this down on 10th September 2018 and
desperately waiting someone to prove me wrong..
अदिती
१० सप्टेंबर २०१८
रात्री ११:५२ वाजता.
Comments
Post a Comment